animated-balloon-image-0002
animated-welcome-image-0050
"सुस्वागतम.! सुस्वागतम..!! सुस्वागतम...!!!" "ध्यास गुणवत्तेचा या ब्लॉगवर आपले साहर्ष स्वागत आहे...!"

Monday, July 13, 2020

*🌳वृक्षवल्ली आम्हा सोयरे...🌳*
*वाढदिवसाचे झाड...*

*वृक्षाचिया ठायी दातृत्व अपार* !
*मायेचा पाझर पांडुरंग* !!

*या अभंगाप्रमाने झाडांचे अनंत उपकार आहेत आपल्यावर याचीच जाणीव ठेवून आज जि.प.प्रा.शाळा वझुर बु.येथे चला झाडे जगवूया अंतर्गत "वाढदिवसाचे झाड " हा उपक्रम घेण्यात आला.*
         *वाढदिवसाचे झाड उपक्रमाअंतर्गत आज वड,कडूनिंब,तसेच भारतीय झाडांची लागवड करून त्यांना ट्री गार्ड बसविण्यात आले यासाठी  शाळेतील शिक्षक श्री भवर सर,वाघ सर,काळे सर,गोसावी सर यांनी  आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने 4 ट्री गार्ड व वडाची झाडे दिली. तसेच गावातील वृक्षप्रेमी ,गावातील शाळेविषयी आपुलकी असणारे  सुभाषराव तुरे सर यांनीही स्वतः  तसेच मुले सचिन तुरे,धनंजय तुरे,नितीन तुरे यांच्याकडून  प्रत्येकी एक  ट्री गार्ड शाळेसाठी दिले... गावातील शिक्षण प्रेमी नागरीक गुलाबदादा चव्हाण यांनी सुद्धा  वाढदिवसाच्या निमित्ताने एक ट्री गार्ड भेट दिले.यामुळे खऱ्या अर्थाने*

  *" झाडेच झाडे लाऊया*
  *लावली झाडे वाढऊया "*

*या घोषणेला बळ मिळाले.*
       *या कामी शिक्षकांना श्रमदानाचे सहकार्य शंकर वाव्हळे, अशोक उपाडे,आकाश वाघमारे सचिन वाघमारे, बाळू चव्हाण, सोनाजी वाघमारे यांचे लाभले..याप्रसंगी शाळेला नेहमी सहकार्य करणारे उपसरपंच  मनोजराव चव्हाण ही उपस्थित होते...*
       *आपण सुद्धा आपल्या कुटुंबीयांच्या, प्रियजणांच्या,वाढदिवसानिमित्त,आई वडीलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, विवाह वाढदिवस एक झाड शाळेत  लावून साजरा करूया...चला सावली पेरूया....🙏🌳🌳🌳🌳🌳🌴🌴🌴🌴☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

शब्दांकन
श्वी. विजय वाघ
जि.प.प्रा.शाळा वझुर बु.*






Tuesday, April 7, 2020

ऑनलाईन टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंकवर टच करा.


टेस्ट क्र. ११

इयत्ता ५ वी - गुणाकार व भागाकार मिश्र उदाहरणे
 या घटकावरील टेस्ट सोडविण्यासाठी येथे टच करा. 
testmoz.com/2869014

टेस्ट क्र. १०
सामान्य ज्ञान चाचणी : राज्य व राजधानी
 या घटकावरील टेस्ट सोडविण्यासाठी येथे टच करा. 



वर्ग ५ वा   विषय : गणित 
टेस्ट क्र. ०९ : मुलभूत क्रिया : बेरीज व वजाबाकी
 या घटकावरील टेस्ट सोडविण्यासाठी येथे टच करा. 
testmoz.com/2761361



सामान्य ज्ञान : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रश्नमंजुषा 
टेस्ट क्र. ०८ :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रश्नमंजुषा 
 या घटकावरील टेस्ट सोडविण्यासाठी येथे टच करा. 
testmoz.com/2754591



वर्ग ५ वा   विषय : गणित 
टेस्ट क्र. ०७ : बीजगणिताची पूर्वतयारी : पदावली ओळख
 या घटकावरील टेस्ट सोडविण्यासाठी येथे टच करा. 
testmoz.com/2721175

वर्ग ५ वा   विषय : गणित 
 टेस्ट क्र. 6 : संख्यावरील क्रिया १
 या घटकावरील टेस्ट सोडविण्यासाठी येथे टच करा. 





वर्ग ५ वा   विषय : गणित 

सम, विषम व मूळ संख्या 
संख्याज्ञान टेस्ट क्र. 3
 या घटकावरील टेस्ट सोडविण्यासाठी येथे टच करा. 
testmoz.com/2696667
वर्ग ५ वा   विषय : गणित 
संख्याज्ञान टेस्ट क्र. 2 
 या घटकावरील टेस्ट सोडविण्यासाठी येथे टच करा. 




वर्ग ५ वा   विषय : सामान्य ज्ञान 

सामान्य ज्ञान  या घटकावरील टेस्ट सोडविण्यासाठी येथे टच करा. 
testmoz.com/2675133


वर्ग ५ वा   विषय : गणित 
संख्याज्ञान 
या घटकावरील टेस्ट सोडविण्यासाठी येथे टच करा. 
testmoz.com/2665221


वर्ग ३ रा     विषय :  मराठी              
पाठ :   रोपटे  या पाठावरील टेस्ट सोडविण्यासाठी येथे टच करा.

Sunday, January 12, 2020

जि.प.प्रा.शा. वझुर बु. शाळेत आज राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.🌹 कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानोबा चव्हाण, सरपंच राम गिराम, शिक्षणप्रेमी युवक ज्ञानेश्वर चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक कौतिक भवर आदी उपस्थित होते. 💐विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा केलेली होती. राजकन्या, संचिता,श्रावणी, बायना, सिद्धी, वेदांत इ. विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. इ.5वी चा विद्यार्थी अथर्व चव्हाण याने कार्यक्रमाचे सूत्रसंचाकेले.



जि.प.प्रा.शा. वझुर बु. शाळेच्या विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षा संपल्यावर मानवत येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास भेट दिली.