animated-balloon-image-0002
animated-welcome-image-0050
"सुस्वागतम.! सुस्वागतम..!! सुस्वागतम...!!!" "ध्यास गुणवत्तेचा या ब्लॉगवर आपले साहर्ष स्वागत आहे...!"

Monday, July 13, 2020

*🌳वृक्षवल्ली आम्हा सोयरे...🌳*
*वाढदिवसाचे झाड...*

*वृक्षाचिया ठायी दातृत्व अपार* !
*मायेचा पाझर पांडुरंग* !!

*या अभंगाप्रमाने झाडांचे अनंत उपकार आहेत आपल्यावर याचीच जाणीव ठेवून आज जि.प.प्रा.शाळा वझुर बु.येथे चला झाडे जगवूया अंतर्गत "वाढदिवसाचे झाड " हा उपक्रम घेण्यात आला.*
         *वाढदिवसाचे झाड उपक्रमाअंतर्गत आज वड,कडूनिंब,तसेच भारतीय झाडांची लागवड करून त्यांना ट्री गार्ड बसविण्यात आले यासाठी  शाळेतील शिक्षक श्री भवर सर,वाघ सर,काळे सर,गोसावी सर यांनी  आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने 4 ट्री गार्ड व वडाची झाडे दिली. तसेच गावातील वृक्षप्रेमी ,गावातील शाळेविषयी आपुलकी असणारे  सुभाषराव तुरे सर यांनीही स्वतः  तसेच मुले सचिन तुरे,धनंजय तुरे,नितीन तुरे यांच्याकडून  प्रत्येकी एक  ट्री गार्ड शाळेसाठी दिले... गावातील शिक्षण प्रेमी नागरीक गुलाबदादा चव्हाण यांनी सुद्धा  वाढदिवसाच्या निमित्ताने एक ट्री गार्ड भेट दिले.यामुळे खऱ्या अर्थाने*

  *" झाडेच झाडे लाऊया*
  *लावली झाडे वाढऊया "*

*या घोषणेला बळ मिळाले.*
       *या कामी शिक्षकांना श्रमदानाचे सहकार्य शंकर वाव्हळे, अशोक उपाडे,आकाश वाघमारे सचिन वाघमारे, बाळू चव्हाण, सोनाजी वाघमारे यांचे लाभले..याप्रसंगी शाळेला नेहमी सहकार्य करणारे उपसरपंच  मनोजराव चव्हाण ही उपस्थित होते...*
       *आपण सुद्धा आपल्या कुटुंबीयांच्या, प्रियजणांच्या,वाढदिवसानिमित्त,आई वडीलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, विवाह वाढदिवस एक झाड शाळेत  लावून साजरा करूया...चला सावली पेरूया....🙏🌳🌳🌳🌳🌳🌴🌴🌴🌴☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

शब्दांकन
श्वी. विजय वाघ
जि.प.प्रा.शाळा वझुर बु.*






Tuesday, April 7, 2020

ऑनलाईन टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंकवर टच करा.


टेस्ट क्र. ११

इयत्ता ५ वी - गुणाकार व भागाकार मिश्र उदाहरणे
 या घटकावरील टेस्ट सोडविण्यासाठी येथे टच करा. 
testmoz.com/2869014

टेस्ट क्र. १०
सामान्य ज्ञान चाचणी : राज्य व राजधानी
 या घटकावरील टेस्ट सोडविण्यासाठी येथे टच करा. 



वर्ग ५ वा   विषय : गणित 
टेस्ट क्र. ०९ : मुलभूत क्रिया : बेरीज व वजाबाकी
 या घटकावरील टेस्ट सोडविण्यासाठी येथे टच करा. 
testmoz.com/2761361



सामान्य ज्ञान : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रश्नमंजुषा 
टेस्ट क्र. ०८ :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रश्नमंजुषा 
 या घटकावरील टेस्ट सोडविण्यासाठी येथे टच करा. 
testmoz.com/2754591



वर्ग ५ वा   विषय : गणित 
टेस्ट क्र. ०७ : बीजगणिताची पूर्वतयारी : पदावली ओळख
 या घटकावरील टेस्ट सोडविण्यासाठी येथे टच करा. 
testmoz.com/2721175

वर्ग ५ वा   विषय : गणित 
 टेस्ट क्र. 6 : संख्यावरील क्रिया १
 या घटकावरील टेस्ट सोडविण्यासाठी येथे टच करा. 





वर्ग ५ वा   विषय : गणित 

सम, विषम व मूळ संख्या 
संख्याज्ञान टेस्ट क्र. 3
 या घटकावरील टेस्ट सोडविण्यासाठी येथे टच करा. 
testmoz.com/2696667
वर्ग ५ वा   विषय : गणित 
संख्याज्ञान टेस्ट क्र. 2 
 या घटकावरील टेस्ट सोडविण्यासाठी येथे टच करा. 




वर्ग ५ वा   विषय : सामान्य ज्ञान 

सामान्य ज्ञान  या घटकावरील टेस्ट सोडविण्यासाठी येथे टच करा. 
testmoz.com/2675133


वर्ग ५ वा   विषय : गणित 
संख्याज्ञान 
या घटकावरील टेस्ट सोडविण्यासाठी येथे टच करा. 
testmoz.com/2665221


वर्ग ३ रा     विषय :  मराठी              
पाठ :   रोपटे  या पाठावरील टेस्ट सोडविण्यासाठी येथे टच करा.

Sunday, January 12, 2020

जि.प.प्रा.शा. वझुर बु. शाळेत आज राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.🌹 कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानोबा चव्हाण, सरपंच राम गिराम, शिक्षणप्रेमी युवक ज्ञानेश्वर चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक कौतिक भवर आदी उपस्थित होते. 💐विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा केलेली होती. राजकन्या, संचिता,श्रावणी, बायना, सिद्धी, वेदांत इ. विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. इ.5वी चा विद्यार्थी अथर्व चव्हाण याने कार्यक्रमाचे सूत्रसंचाकेले.



जि.प.प्रा.शा. वझुर बु. शाळेच्या विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षा संपल्यावर मानवत येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास भेट दिली.

Thursday, December 26, 2019

जि.प.प्रा.शा. वझुर बु. येथे आज विद्यार्थ्यांसोबतच पालक, ग्रामस्थ व शा.पो.आ. शिजविणाऱ्या ताई यांनी घेतला सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद.
ग्रहण ही एक फक्त  खगोलीय घटना आहे. ग्रहण हे सावल्यांचा खेळ आहे. यामागे काहीही अशूभ नाही. हे समजून घेतले.
ग्रहण संपल्यानंतर पालकांनी जाता जाता स्वंयप्रेरणेने श्रमदानातून शालेय परिसरातील वाढलेले गाजर गवत उपटले. व परिसर स्वच्छ केला.
सर्व पालक व गावकऱ्यांचे शाळेच्या वतीने मनापासून धन्यवाद.

Wednesday, December 25, 2019


जि.प.प्रा.शा. वझुर बु. शाळा आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित.
दिनांक 24 /12/2019 रोजी रेणुका मंगलकार्यालय परभणी येथे जिल्हापरिषद शिक्षण विभाग,परभणी वतीने गुणवंत विद्यार्थी, आंतराष्ट्रीय शाळा, आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा 2019 - 20 कार्यक्रमाचे उदघाटक मा.श्री सुनीलजी केंद्रेकर विभागीय आयुक्त औरंगाबाद,कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा.सौ.उज्वलाताई राठोड अध्यक्षा जिल्हापरिषद परभणी,प्रमुख उपस्थिती मा.श्री बी.पी.पृथ्वीराज मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद परभणी,मा.सौ.भावनाताई अनिलराव नखाते उपाध्यक्षा जिल्हापरिषद परभणी,मा.श्री अशोकराव काकडे सभापती बांधकाम व अर्थ समिती जिल्हापरिषद परभणी,मा.श्री अजयराव चौधरी सदस्य जिल्हापरिषद परभणी,मा.सौ.सुष्माताई देशमुख सदस्या जिल्हापरिषद परभणी,मा.श्री राजेंद्र लहाने सदस्य जिल्हापरिषद परभणी,मा.श्री अनिलराव नखाते सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी,मा.श्री राजेश फड सदस्य जिल्हापरिषद परभणी,मा.श्री शंकरराव वाघमारे सदस्य जिल्हापरिषद परभणी,मा.श्री विष्णू मांडे सदस्य जिल्हापरिषद परभणी,मा.श्री माणिकराव घुंबरे सदस्य जिल्हापरिषद परभणी,मा.श्री गोविंदराव देशमुख,मा.श्री नारायणराव जाधव सदस्य जिल्हापरिषद परभणी,मा.श्री राधेश्याम वाढवे सदस्य जिल्हापरिषद परभणी,मा.डॉ.सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हापरिषद परभणी,इतर कर्मचारी,शिक्षक व पुरष्कार प्राप्त विदयार्थी दिसत आहेत.





Saturday, July 28, 2018

🌻🧥👖👔👗👘🎯🌻
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वझुर बु.🏠*
_*@ No दप्तर 🎒 Day@*_ *शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच जीवन उपयोगी कौशल्य हस्तगत करता यावीत* म्हणून शिवण कामाविषयी माहिती देण्याकरिता शिवणकाम व्यवसायिक भेट उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.  सर्व विद्यार्थी उत्सुकतेने टेलर सोनाजी वाघमारे यांच्या शिलाई मशीन दुकान मध्ये गेले. त्यांनी त्यांच्या कामाविषयी, उपयोगात येणाऱ्या साहित्याची माहिती मुलांना दिली. प्रत्यक्षात शिवणकाम करून दाखवले. विद्यार्थ्यांनी अतिशय उत्सुकतेने  सर्व माहिती समजावून घेतली. लहान मुलांनी कुतूहलाने सर्व साहित्याची माहिती व उपयोग समजून घेतली. शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री. विजय वाघ सर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम यशस्वी झाला. मुख्याध्यापक श्री. भवर सर यांनी टेलर सोनाजी वाघमारे यांचे आभार मानले.
🙏🏻🙏🏻🙏🏻
☘🌿🌱🌻🌲🌳🌴🍀
🎆🎇🎆🎆🎆🎆